इचलकरंजीत आयजीएममध्ये सिटीस्कॅन मशिनचा शुभारंभ!

इचलकरंजी वस्त्र नगरी म्हणून सगळीकडेच ओळखली जाते. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या सिटीस्कॅन मशिनचा शुभारंभ सोमवारी आ. प्रकाश देव आवाडे, माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवि जावळे आणि करी, वयोवृध्द रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. बसू सिटीस्कॅन कामी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ. राहुल आवाडे, रुग्णकल्याण सदस्य कपिल शेटके उपस्थित होते.

याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मौलाना जमादार, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, संजय केंगार, महादेव कांबळे, चंद्रकांत पाटील, नरसिंह पारीक, रमेश कबाडे, अविनाश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.