सध्या प्रत्येक भागात वाहतुकीचा प्रश्न खूपच जोर धरू लागला आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. हातकणंगले येथील पोलीस ठाण्याच्या आवारात पार्किंगचा बट्ट्याबोळ उडाला आहे. वाटेल तशा पद्धतीने वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांना अडथळा निर्माण होत आहे. तरी हे पार्किंग सुस्थितीत करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे..
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंग, नागरीकांना अडथळा
