हुपरी येथील शेंडुरे महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कलावाणिज्य विभागामार्फत अक्षरबन भित्तीपत्रिकेचे प्रकाशन व राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील विविध लेखांचे छायाचित्र व ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार यांच्या कार्याचा मागोवा घेतला. यामध्ये मानसिंग देसाई, किरण कांबळे, बाहुबली गाट, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ. विजय पाडळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संध्या माने यांनी सुत्रसंचालन केले. आभार प्रा. बी. बी. जाधव यांनी मानले. यावेळी प्रा. एम. एस. मुजुमदार, प्रा. एम. एल. सोनटक्के, ग्रंथपाल प्रा. एम. एस. शिर्के यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.