रेंदाळ येथे उद्या मकर संक्रातीनिमित्त हळदी कुंकू, तिळगूळ वाटप व महिला मेळावा

आज मकर संक्रांति सण सर्वत्र साजरा केला जात आहे. मकर संक्रांती हा सण सुहासिनींसाठी खूपच महत्वाचा असतो. आजपासून अनेक महिलांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक प्रकारचे वाण देखील दिले जातात. अनेक मंदिरात, घरात तसेच अनेक सार्वजनिक स्थळी असे हळदी कुंकवाचे आयोजन केले जातात. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक व लोककल्याण कमिटी यांच्या वतीने मकर संक्राती निमित्त हळदी कुंकू, तिळगूळ वाटप व महिला मेळावा उद्या बुधवारी म्हणजेच १५ जानेवारीला दुपारी तीन वाजता विठ्ठल मंदिर रेंदाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

इचलकरंजी जिव्हाजी सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा अंजली बावणे यांच्या अध्यक्षतेखाली व रेंदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. चला महिलांनो, जग जिंकुया या विषयावरती युवा व्याख्यात्या निवेदिका कु. तेजस्विनी पांचाळ यांचे व्याख्यान होणार असून जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन अरुण महाजन, व्हा. चेअरमन सत्यजित पाटील, लोककल्याण कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगारे, उपाध्यक्ष अनिल विभुते, संचालिक पुष्पांजली पाटील, शिला घोडेस्वार तसेच सर्व संचालक, लोककल्याण कमिटीचे सदस्य यांनी केले आहे.