आमदार रोहित पाटील यांचा अधिवेशनात घणाघात….

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या तिसरा दिवस शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांनी गाजला. यावेळी अनेक आमंदारांनी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं.यावेळी तासगाव कवठेमहाकाळचे आमदार रोहीत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायत दारांचा प्रश्न सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी, माझ्या जिल्ह्यातील द्राक्ष बागायदारांचे कंबरडे मोडत आहे, मात्र सरकारला जाग नाही, असा घणाघात केला.

सभागृहात अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान रोहीत पाटील यांनी, राज्यपाल राज्य सरकारने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याचे सांगत आहेत. मात्र नाशिकनंतर सर्वाधिक द्राक्षाचे उत्पन्न माझा मतदारसंघ असणाऱ्या जिल्ह्यात होते. गेली १० वर्ष झाली कापूस आणि सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन केली गेलीत. त्याकडे लक्ष देतं. पण द्राक्षाला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही आदोलन उभारूनही सरकारने याकडे लक्ष दिलं नाही, असा आरोप रोहीत पाटील यांनी केला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकाचे आज कंबरडे मोडलं आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. यामुळे नुकसान भरपाईची मागणी आज शेतकरी करत आहेत.