इचलकरंजीत अमित शहांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीची  निदर्शने……

राज्यसभेत भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्याबाबाबत भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली. अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करताना घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

यावेळी महाविकास आघाडीचे शशांक बावचकर,मलकारी लवटे,कॉ.भरमा कांबळे,सदा मलाबादे,बाबासाहेब कोतवाल संभाजी सूर्यवंशी,योगेश कांबळे,किशोर जोशी,दशरथ जावळे,सतीश कांबळे,ताजुद्दीन खतीब,जविद मोमीन,अब्राहम आवळे,जीवन गंवडी,भाऊसाहेब कसबे,बजरंग लोणारी,रोहित गवळी,अजित मिणेकर,चंद्रकांत कांबळे,आण्णा कांबळे,सुरज लायकर,अजित होगाडे,रमेश कांबळे,तौफिक लाटकर,बिस्मिल्ला गैबान,दशरथ माने,दत्ता मांजरे, साजीद मकानदार,दिलीप भोई उपस्थित होते.