वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न तर ऐरणीवर आहेच अशातच आता डेंग्यूचा देखील त्रास नागरिकांना सहन करण्याचा धोका निर्माण झालेला आहे. इचलकरंजी शहरांमध्ये गेल्या काही दिवसा ंपासून डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण देखील वाढलेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने इचलकरंजी शहरातील गटारींची नियमित स्वच्छता तसेच कचरा उठाव कामावर भर देऊन संभाव्य साथीचे आजार टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखण्याची मागणी शहरवासीयांनातून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.