पत्राशेड मधील अँगलला मफलरने गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी तालुका सांगोला येथे घडली आहे. महादेव हिराप्पा गावडे असे गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महादेव गावडे राहणार गावडेवाडी तालुका सांगोला व सध्या राहणार कर्नाटक टक्कलगी, याने अज्ञात कारणावरून मुक्ताबाई रामा गावडे यांच्या जमीन गट क्रमांक 149/3 मधील शेतातील पत्राशेडच्या अँगलला मफलरने गळफास घेऊन मयत झाला आहे. त्याच्या मरणाबाबत माझी कोणा विरुद्ध तक्रार आगर कोणावर काही संशय नाही म्हणून मयताचे वडील हिराप्पा सुखदेव गावडे यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास व्हरे करीत आहेत.
Related Posts
सांगोल्यात महायुतीत बिघाडी!विधानसभेला आमदार शहाजीबापूंच्या वाढणार अडचणी….
सोलापूरच्या सांगोल्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील…
मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा बहिष्कार
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकने व व लोकसभा आचारसंहिता पूर्वी निर्णय नाही…
विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या तिकिटासाठी चुलतबंधूमध्ये होणार रस्सीखेच
स्वर्गीय आबासाहेबांनी (गणपतराव देशमुख) दिलेली जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. आबासाहेबांनी सांगोला तालुक्यासाठी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाकडे घेवून…