परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडमोड, आंदोलनात अटक केलेल्या कार्यकर्त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात व्यक्त केलेले विचार तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सर्व घटनांच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच मंगळवारी 24 डिसेंबर रोजी पुलाची शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय विविध समाज व संघटनांनी घेतलेला आहे. हा बंद गावासह परिसरातील लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून यशस्वी करावा असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
Related Posts
हुपरीत उद्या स्व. आप्पासाहेब बळवंत नाईक व एल. वाय. पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!
हुपरी परिसरातील सहकार, शेती व शिक्षण तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व संस्थापक स्व. आप्पासाहेब बळवंत नाईक व एल. वाय. पाटील यांच्या…
खासदार माने-आवाडे यांच्यात रंगले कुरघोडीचे राजकारण…..
खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यातील शीतयुद्ध काही केल्या संपायला तयार नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
साधेपणाने सत्याजित पाटील यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल…….
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील – सरूडकर यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने…