उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात उतरावे; मिहीर शहा

सोन्या चांदीच्या दागिन्यांना अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शासनानेही निर्यात वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना चालू केल्या आहेत. याचा फायदा घेऊन उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात उतरावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय निर्यात प्रशिक्षक मिहीर शहा यांनी केले. हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन व केंद्र सरकार पुरस्कृत जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्या संकल्पनेतून चांदी उद्योजकांसाठी दागिने निर्यात प्रशिक्षण शिबिर झाले. कौन्सिलचे संचालक मिथिलेश पांडे यांनी, जीजेईपीसी कडून नवउद्योजकांना निर्यातीसाठी विविध योजनांची माहिती दिली. दुबई व ऑस्ट्रेलियात दागिने निर्यात करणाऱ्यांना शुन्य टक्के कर आहे. नवं उद्योजक पराग वर्धमाने व शुभम नवाळे यांना उदयोन्मुख दागिने निर्यातदार २०२४ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.