हातकणंगले तालुक्यात अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो,. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान अष्टापद तीर्थ आदिनाथ तीर्थकरांच्या पंचकल्याणिक पूजा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने याची जिल्हा कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. कार्यक्रमादरम्यान चोख व्यवस्था ठेवाण्यात यावी, यासह गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिल्या. याची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणीही सुरु केली.
या पुजेकरिता विशुद्धसागर मुनी महाराज सहसंघ, बाहुबली महाराजांचे संघातील, प्रमुख गणिनी आर्यिका श्री १०५ मुक्तीलक्ष्मी माताजी प्रमुख गणिनी आर्यिका श्री. १०५ जिनदेवी माताजी आर्यिका श्री १०५ निर्वाणलक्ष्मी माताजीसर्व त्यागी त्यासोबतच देशातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविका येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीत दिली. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
पाण्याच्या स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करावे,वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, रस्त्यांवरती दिशादर्शक फलक लाववावेत, फिरते शौचालय पुरवठा, तात्पुरत्या वीज जोडणीची व्यवस्था, आरोग्य विभाग सतर्क ठेवावा, नोडल अधिकारी नियुक्त करावेत, हेलीपॅडची व्यवस्था करावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे रस्ते सुधारणा करावी, अग्निशमन व्यवस्था सज्ज ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीस आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार सुशील बेलेकर, डॉ. व्ही. एन. पाटील, अभिनंदन खोत, जयपाल चिंचवाडे, किरण पाटील, माजी उपसरपंच शितल खोत, बाबासाहेब कापसे, सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच मालती इंगळे, अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, हर्षवर्धन कापसे व समिती प्रतिनिधी उपस्थित होते.