भुयारी गटारींसाठी १०० कोटी! पेठवडगावच्या हद्दवाढीचा प्रस्ताब सादर करण्याचे आदेश 

पेठवडगाव शहरासाठी प्रस्तावित असणाऱ्या सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देण्याबाबत नगरविकास विभागास निर्देश दिलेले आहेत. भुयारी गटर योजनेची क्षमता ५ दशलक्ष लिटर प्रति दिवस इतकी आहे. या योजनेमुळे शहरात तयार होणारे सर्व दूषित पाणी प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जाणार आहे. योजनेची अंदाजपत्रकीय किंमत ९४ कोटी ५७ लव ७९ हजार रुपये इतकी आहे.

पेठवडगाव महसुली क्षेत्र १५०८.४९.६३ हेक्टर असून त्यातील सध्याच्या वडगांव नगरपरिषद हदीत एकूण क्षेत्र ७४० हेक्टर आहे. सध्या नगरपरिषदेत समाविष्ट नसलेले ७६८.४९.६३ हेक्टर क्षेत्र एवढे असून या समाविष्ट नसणाऱ्या क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यरत नसल्याने या क्षेत्राचा हद्दवाढीत समावेश होणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणेत आला आहे. नगरपालिकेची हद्दवाढ झालेली नसल्याने वडगांव महसूल हीमध्ये होणाऱ्या विकासांवर नगरपरिषद अथवा इतर कोणत्याही प्राधिकरणाचे निर्बंध नसल्याने विकास कामे होत नाहीत. त्यामुळे हदीप्रमाणे वाढ होणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तातडीने प्रस्ताव सादर करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याचेही आ. माने यांनी सांगितले.