आटपाडीत २४ तारखेला भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. आटपाडी तालुक्याचे सुपुत्र, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडी येथे दिनांक २४ रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्यानिमित्त कार्यकर्त्यांची नियोजन बैठक सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या उपस्थित आटपाडी येथे संपन्न झाली.
यावेळी तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांना नागरी सत्कार सोहळ्यास आलेल्या प्रमुख कार्यकर्ते यांनी आपपल्या गावात जावून बैठका घेवून गावातील प्रत्येक नागरिकांना या सोहळ्याचे निमंत्रण द्यावे. त्येकाने आपापले काम जबाबदारीने पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरी सत्कार सोहळ्या निमित्त आटपाडी शहरात असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांवर हेलिक्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच आटपाडी शहरात भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू. टी. जाधव, आटपाडीग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत दौडे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, भाजपचे युवा मोर्चाचे प्रणव गुरव, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी व्हा.चेअरमन महादेव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक विष्णूपंत अर्जुन, गणेश भुते, अनिल सूर्यवंशी, सचिन डिगोळे, जीवन कासार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.