इचलकरंजी ते आटपाडी या बसमध्ये प्रवास करत असताना सुप्रिया दिपक (रा. शेटफळे ता. आटपाडी) यांनी पर्समध्ये ठेवलेले सुमारे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
सुप्रिया गायकवाड या दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान इचलकरंजी ते आटपाडी असा प्रवास करत होत्या.
डबीमध्ये ठेवलेले साडेपाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत आटपाडी पोलिसा कसून तपास करीत आहेत. याबाबत आटपाडी पोलिसांकडून सोन्याच्या चोरीच्या तपासांना किती यश येत ते पहावे लागले.
अलिकडच्या काळात सोन्याचे भाव सुध्दा तेजीने वाढत चालल्यामुळे प्रवासांनी एसटीबस मध्ये सावधपणे आपले मौल्यवान दागिणे जपून ठेवले पाहिजेत असे बसस्थानकावर सुचना दिल्या जातात.