विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात नेते मंडळींची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघात देखील महाविकास आघाडी कडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघ महाविकास आघाडीत नेमका कोणाला सुटणार याबाबत अनेक दिवसांपासून तिढा होता. गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खानापूर मतदारसंघावर आपला दावा केला होता. परंतु मतदारसंघातील परिस्थिती पाहता खानापूर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे असा रिपोर्ट देखील सांगली शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना गेल्याची चर्चा आहे.
त्यामुळे या संपूर्ण बाबींचा विचार करून या मतदारसंघात बदल करून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत आणि ही चर्चा जवळजवळ फायनल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघात शरद पवार यांची तुतारी वाजणार असल्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
खानापूर मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवरील चर्चा जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. महाविकास आघाडीत खानापूर मतदारसंघाबाबत एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघ शरद पवार गटाला फायनल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे देखील खानापूर आटपाडी मतदारसंघ बदलून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून तुतारी फायनल झाल्याचे बोलले जात आहे.