अजित दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी दरम्यान वैभव दादांनी जयंतराव यांच्यासह अनिल भाऊंवर टीकास्त्र सोडले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे आपल्या हातात घेतली होती.कॉन्स्टेबल सुद्धा आपलं ऐकेल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी केली आहे. अजित दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी दरम्यान वैभव दादांचे हे टीकास्त्र सोडले.
सत्तेत वाटा असताना आणि आपला पालकमंत्री असतानाही आम्हाला न्याय मिळाला नाही. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे आपल्या हातात घेतली कॉन्स्टेबल सुद्धा आपलं ऐकेलं का नाही अशी परिस्थिती दरम्यानच्या काळामध्ये निर्माण झाली होती. अशी टीका जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी केलेली आहे.
वैभव दादा पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून जे काही राजकीय क्षेत्रांमध्ये जडणघडण झाले. म्हणजेच अजित दादांनी महायुतीत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री पद मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नऊ जणांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं. त्यावेळेस सगळ्यांचीच द्विधा मनस्थिती होती.
४ वर्षापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला होता. आपण सर्वजण एकत्र येऊन काम करावे तसेच कार्यकर्त्यांना आधार द्यायचा म्हणजेच ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी एकजुटीने काम करेल याकडे सर्वच कार्यकर्त्यांचे लक्ष होते.
कार्यकर्त्यांना बळ मिळावं तसेच कार्यकर्त्यांचा स्वाभिमान टिकावा तसेच अनेक छोटी-मोठी कामे पूर्ण व्हावी आणि ही कामे पूर्ण करीत असताना आपल्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान कुठेही घाण ठेवण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं ठरवलं.
चार वर्षाच्या पाठीमागे त्यावेळेस आपल्या सर्वांचेच नशीब चांगलं होतं की त्यावेळेस पालकमंत्री जयंतराव पाटील होते.त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून काहीही वैयक्तिक इच्छा न बाळगता फक्त त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान हा राखता यावा अशी आमची माफक इच्छा होती.
त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही एकत्र असल्यामुळे येथील स्थानिक आमदार देखील शिवसेनेमध्ये होते. लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये असून सुद्धा पालकमंत्री आपले असून सुद्धा म्हणावा तसा न्याय त्यावेळेस आम्हाला मिळालेला नाही. असे वैभव दादा म्हणाले. बऱ्याच वेळा आम्ही पालकमंत्र्यांना विनवणी देखील केली की आपल्या मतदारसंघात भविष्यात जर कार्यकर्ते वाढवायचे असतील भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार व्हावा असे जर वाटत असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करण्याच्या सूचना द्यायला हव्यात.
त्यावेळेस भरपूर विनंती करून देखील जयंत पाटील यांनी अनेक कारणे सांगितली. तीन मतदारसंघ एकत्र असल्यामुळे खूप अडचणी आहेत असे त्यावेळेस त्यांनी सांगितले. त्यावेळेस पालकमंत्री आपले असताना तसेच आपला सरकारमध्ये सिंहाचा वाटा असताना देखील काहीच उपयोग झाला नाही.