साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत इस्लामपूरातील प्रभाग ५ मधील तक्षशिला ज्ञानकेंद्र सर्वे नंबर १३३ / २ येथे नवीन अभ्यासिकेचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ६३ लाख ९८ हजार ८२५ रुपयांचा निधी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रयत्नातून मंजूर झाला असल्याची माहिती भाजप नेते विक्रमभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.विक्रमभाऊ पाटील म्हणाले, तक्षशिला ट्रस्ट ने इस्लामपूर नगरपालिकेला ४८०० स्क्वेअर फूट जागा मोफत दिली आहे.
या जागेवर २०० ते ३०० विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेचे नियोजन करण्यात आले आहे. या जागेवर अभ्यासिका उभारण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यायला लागत होती तक्षशिलाने कोणताही संकोच न बाळगता विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेची सोय व्हावी या हेतूने धर्मादाय आयुक्त यांना परवानगीचे पत्र दिले. त्यामुळेच हा निधी उपलब्ध करण्यात आला.
या अभ्यासिकेची इमारत तीन मजली असणार आहे. यामध्ये टेबल,पुस्तके,लाईट, पाणी, इंटरनेटची सुविधा असणार आहे. या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना या पत्रकार परिषदेस प्रा. संजय बनसोडे, प्रकाश कांबळे, कुबेर कांबळे, समीर मुल्ला, बबन कदम शिवराज यादव, सुबोध यादव हे उपस्थित होते.