हातकणंगले आळते येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या फंडातून साठेनगर येथे क्रांतिवीर फकिरा साठे सांस्कृतिक भवनच्या पायाखुदाईचा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक भवनसाठी २५ लाख मंजूर झाले असून कोल्हापूर जिल्हा दलित महासंघाचे कार्याध्यक्ष विलास आप्पासो कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पायाखुदाई कार्यक्रम आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमास आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्या अलका अशोक आळतेकर, ग्रा. पं. सदस्य संतोष कोंडीबा कांबळे, अंकुश बबन कांबळे, रुदाबाई ज्ञानू कांबळे, प्रा. अशोक आळतेकर, किसान डेअरी संचालक मनोहर कांबळे, श्रीधर कांबळे, सुरेश आळतेकर, विजय कांबळे, उत्तम कांबळे, माजी उपसरपंच भीमराव कांबळे, जालिंदर (जे. के.) कांबळे, सुरज कांबळे, अनिल कांबळे, अनिकेत कांबळे, लखन कांबळे, निखिल कांबळे, अरुण कांबळे, सुभाष कांबळे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, मान्यवर, समाज बांधव व महिला वर्ग उपस्थित होता.