पोलिसांना वाळू गाडीची टीप का दिली म्हणून चौघांकडून एकास मारहाण, फिर्याद दाखल

अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खून, मारामारी तसेच अनेक फ्रॉडच्या घटना घडत असतानाचे चित्र दिसतच आहे. तुझ्यामुळे माझ्या वर वाळू चोरीची केस झाली, तू पोलिसांना माझ्या गाडीची टीप का दिली. तुला बघून घेतो असे म्हणून चार जणांनी एकास शिविगीळ आता तुला जिवंत सोडत नाही म्हणून कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करून १५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील कडलास येथे घडली.

शरद अरुण केदार (रा. कडलास, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घरी असताना ओळखीचे पवन पांडुरंग पवार हातात कुऱ्हाड घेऊन तसेच अजय विजय पवार, अभय विठ्ठल पवार, रोहित पांडुरंग पवार हे हातात काठ्या घेऊन माझ्या घरी येऊन तुला लय मस्ती आली आहे काय, तुझ्यामुळे माझ्यावर वाळू चोरीची केस झाली आहे. तू पोलिसांना माझ्या गाडीची टीप दिली आहे. तुला आता बघुनच घेतो, असे म्हणून फिर्यादीस शिविगाळ करुन तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून रोहित पवार, अभय पवार, अजय पवार यांनी फिर्यादीस काठीने व लाथाबुक्याने मारहाण केली.

पवन पवार याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने हाताच्या कोपऱ्यावर  माराहाण करुन तुझ्यामुळे माझ्यावर केस झाली आहे. त्याचे खर्च तूच द्यायचे असे म्हणून खिशातील १५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास पुन्हा तुला याच्यापेक्षा जास्त मार मिळेल, अशी धमकी दिली. या मारहाणीत हात फ्रॅक्चर झाल्याबाबत शरद केदार याने चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.