हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील खुनाच्या प्रकरणी अटक संशयित दोघांना वडगाव वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.यश किरण दाभाडे याच्या खूनप्रकरणी हर्षल दीपक दाभाडे व शफिक ऊर्फ जोकर शौकत मुल्ला या दोघांसह एका अल्पवयीन तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
वडगाव पोलिसांनी त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एल. एम. पठाण यांच्यासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सूनावण्यात आली आहे; तर अल्पवयीन तरुणास बालसुधारगृहात ठेवण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक तपास करत आहेत.