रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्रं आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी रेशन कार्डचे वाटप केले आहे. रेशन कार्डवर तुम्हाला दर महिन्यात कमीत कमी रुपयांमध्ये रेशन मिळवते.यात आता नवीन अपडेट समोर आली आहे.तुमच्या धान्य दुकानावर रेशन आलं की त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन धान्य आलं की नाही हे सारखं विचारण्याची गरज भासणार नाही.
आता नवीन नियमांनुसार तुम्हाला धान्य रेशन दुकानावर आल्यावर मोबाईलवर मेसेज येणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची नोंद करावी लागणार आहे.शासकीय गोदामातून धान्य दुकानाकडे रवाना केल्यानंतर परिसरातील लोकांना लगेचच एसएमएस पाठवला पाहिजे, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.
रेशन दुकानावर धान्य आले की नाही याचा मेसेज येण्यासाठी तुम्हाला आधी मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे. ही प्रक्रिया विनामूल्य होणार आहे.तुम्हाला फक्त रेशन दुकानावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे,