इचलकरंजी शहरात अनेक घडामोडींना वेग आलेला आहे. शहरातील आणखी एक गट पुढील काळात राजकीय भूमिका बदलण्याची शक्यता आहे. तूर्त तरी या गटाची भूमिका ‘जैसे थे’ आहे. पण नवीन वर्षात होणाऱ्या नवनव्या राजकीय घडामोडींमुळे मात्र वस्त्रनगरीच्या राजकारणाची दिशाच बदलण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चाळके गट हा महाविकास आघाडीसोबत होता. दोन्ही निवडणुकीत या गटाने आघाडीच्या उमेदवारांचा प्रभावीपणे प्रचार केला होता. किंबहूना महाविकास आघाडीत एक प्रभावी ताकद म्हणून या गटाकडे पाहिले जाते. लवकर हा गट हातात घड्याळ बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आहे.
या गटासह आणखी दोन प्रभावी नेतेही या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आगामी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला वेग आला आहे. नववर्षात या घडामोडीला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थीतीत मूर्त स्वरुप येण्याची शक्यता आहे. या गटाने साथ सोडल्यास महाविकास आघाडीला काही अंशी फटका बसू शकतो. नवीन वर्षात वस्त्रनगरीच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.