हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ६ तालुक्यातील ९ नगरपालिकांना १० कोटी ९ लाख रुपयांचा विकासनिधी मिळाला आहे. याकामी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले. आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तर सांगली जिल्ह्यातील ३ नगरपालिकांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हा निधी मिळाला असून अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती खासदार माने यांनी दिली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांना विकास निधी मिळावा. यासाठी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. आता निधी मिळाला आहे. येत्या महिन्याभरात आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार माने यांनी म्हटले आहे.
नगरपालिकानिहाय मिळालेला निधी- (रक्कम कोटीत)
हुपरी 9.90
जयसिंगपूर १.२०
पेठवडगाव १.०३
शिरोळ १०३
कुरुंदवाड १.२०
हातकणंगले १.२०
आष्टा 9.00
इस्लामपूर १.५४
शिराळा ०.९०