केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वरून CBSE 10 वी आणि 12 वीचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.तसेच CBSE बोर्डाच्या परीक्षेची तारीखही तुम्ही तपासू शकता.CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, 10 वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 2 एप्रिलला संपणार आहे.सीबीएसईच्या परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होतील. विद्यार्थी CBSE 10वी आणि 12वीचे वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील.
CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.त्यानंतर 10वी आणि 12वी टाइम टेबल 2024 च्या लिंकवर क्लिक करा.आता तुमच्या समोर टाइम टेबलची PDF ओपन होईल.विद्यार्थी ही PDF तपासू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.गेल्या सत्रात सीबीएसईने 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा घेतली होती.
तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीत झाली होती.त्याच वेळी, या परीक्षेचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला. CBSE बोर्ड परीक्षेशी संबंधित नवीन अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देतो.