अलीकडच्या काळात अनेक जण हे मद्याच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांची घरे देखील उध्वस्त झालेली आहेत. संसार मोडखळीस आलेले आहेत. वडगाव येथे दारू आणि गांजाची खुलेआम विक्री होत होती. हा अड्डा महिलांनी उद्ध्वस्त केला.
हा दारू अड्डा चालवणाऱ्याला अटक करावी अशी मागणी महिलांनी केली. अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला.यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.