अज्ञात व्यक्तीने पेटवली दुचाकी…..

कुरळप (ता. वाळवा) येथील धनगरवाड्यात दीपक मेटकरी यांची घराच्या अंगणात लावलेली दुचाकी मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. यामध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. रात्री पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज आल्याने दीपक मेटकरी व त्यांची पत्नी यांनी दरवाजा उघडून पाहिले असता अंगणात गाडी पेटत असल्याचे दिसून आले. मेटकरी यांनी तत्काळ शेजारील लोकांना उठवून पाणी मारून आग विझवली.

मात्र, तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. घटनास्थळापासून काही अंतरावरील सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता पांढरा शर्ट घातलेला एक तरुण गाडी पेटवून पळत जाताना दिसून आला. मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या घटनेची नोंद कुरळप पोलिसात झाली असून, दीपक मेठकरी यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कुरळप पोलिसात तक्रार दाखल केली आहे.