इचलकरंजी शहरासाठी म्हणजेच विकासाच्या दृष्टीने अनेक नेत्यांनी भरीव निधी मंजूर करून आणलेले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासात भर पडलेली आहेच. समाजवादी प्रबोधिनी परिसरातील रस्ते कामाचा शुभारंभ झाला. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये विविध नागरी विकासाकामासाठी सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयाचा निधी मंजुर करून आणाला आहे. नगरोथ्यान व दलितवस्ती योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. सत्ता आणि पदावर नसताना मी प्रभाग क्र. १२ मधील जनतेसाठी विकास कामे केली आहेत यापुढेही करत राहणार असल्याचे मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजी शहरातील समाजवादी प्रबोधिनी भागात सुमारे २० लाख रूपये खर्चाच्या हॉटमिक्स रस्त्याच्या कामास शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने व प्रकाश मोरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी उपनगराध्यक्ष रवी रजपूते व विलासराव गाताडे अध्यक्षस्थानी होते. येत्या आठवड्यात हॉटमिक्स रस्त्याचे हे काम पूर्ण होणार आहे. खास धैर्यशील माने, आम. डॉ. राहूल आवाडे, माजी आम. प्रकाश आवाडे व माजी आम.सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नामुळे आणि रवी रजपूते यांच्या विशेष पाठपुराव्यातून या रस्त्यासाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून रस्ते कामाचा शुभारंभ झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.