महाजन परिवाराचे सामाजिक कार्य कौतुकास्पद खास. धैर्यशील माने यांनी काढले गौरवोद्गार

प्रत्येक शहरात अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. याचा पुरेपूर फायदा देखील सर्वसामान्य जनतेला होत असतो. तसेच प्रत्येक शहरात असे काही लोक असतात ज्यांना समाजसेवेची आवड असते. सुनिल महाजन आपल्या अथक परिश्रमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. स्व. श्री. सितारामजी महाजन यांच्या स्मरणार्थ श्री साईप्रसाद ग्रुपच्यावतीने महेश क्लब येथे भव्य रक्तदान शिबीर दिव्यांग, वृध्द व विधवा महिलांना धान्य वाटप आणि शववाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.

महाजन परिवार आणि साईप्रसाद ग्रुपच्यावतीने नागरिकांची गरज ओळखून शववाहिका लोकार्पण केली. तर गोरगरीब, दिव्यांगांना धान्य वाटप केले. सर्वसामान्य, गोरगरीब व दिव्यांगांसाठी महाजन परिवार करीत असलेले सामाजिक कार्य खरोखर कौस्तुकास्पद आहे, असे गौरवोद्गार खास. धैर्यशील माने यांनी काढले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास खास. धैर्यशील माने बोलत होते. खास. माने पुढे म्हणाले, सुनिल महाजन आपल्या अथक परिश्रमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. आपले समाजाप्रती असलेले दायित्व वडील सिताराम महाजन यांच्या प्रेरणेतून ते शूध्द भावनेने ‘जिंदगी के साथ और जिंदगी के बाद सेवा करीत आहेत.

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, पैसा तर सर्वांच्याकडे असतो परंतु दान करण्याची प्रवृत्ती कमी असते. परंतु सुनिल महाजन हे गोरगरीब, सर्वसामान्य व दिव्यांगांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असून निश्चितच त्यांना गोरगरीबांच्या अशिर्वाद लाभले आणि त्यांनी अशीच सेवा पुढे सुरू ठेवावी, असे सांगितले.