चालू वर्ष 2024 हे संपयायला आता काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष अतिशय चांगलं राहिलं आहे. जिथे कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.त्याच वेळी काही मोठ्या बजेट चित्रपटांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर धूम केली आहे.
आता 2025 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सूक आहेत. हे नवीन वर्ष भारतीय चित्रपटांसाठी खास असणार आहे. कारण या वर्षी अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जे जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करतील.
देवा
प्रसिध्द चित्रपट निर्माता रोशन एंड्रयूज “देवा” नावाचा एक शानदार थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य अभिनेता असून तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या सोबत पूजा हेगडे दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
वॉर-2
बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन वॉर – 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा ॲक्शनपॅक्ड सिक्वेल अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीही दिसणार आहे. सध्या हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लाहोर 1947
गदर 2 नंतर सनी देओलकडे चित्रपटांची रांग लागली आहे. लाहोर 1947 हा त्याचा पुढचा मोठा चित्रपट आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याने त्याचे शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. तर आमिर खान त्याची निर्मिती करत आहे.
कंतारा चॅप्टर -1
प्रसिध्द दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कंताराने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम रचले आहेत. यानंतर त्याचा प्रीक्वल येणार आहे. ज्यामध्ये कल्पनेसह लोककथांचे मिश्रण असेल. याचेही दिग्दर्शन ऋषभ शेट्टीच करणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिकंदर
सिकंदर हा सलमान खानचा चित्रपट आहे. सध्या सलमान त्याच्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असेल. चित्रपटात रश्मिका मंदान्ना, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाकडून निर्मात्यांनाही मोठ्या अपेक्षा आहेत.
120 बहादुर
एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅप्पी स्टुडिओजचा 120 बहादुर या चित्रपटातून भारतीय लष्कारातील सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला श्रद्धांजली अर्पण करण्याचा उद्देश आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट मेजर शैतान सिंग पीव्हीसी आणि 1962 च्या रिजांग लाच्या नायकांची शौर्यगाथा सांगेल.