टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. युजवेंद्र चहलने 2020 मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न केले. मात्र, लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली असतानाच घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. धनश्री वर्मा हिला तेलगू चित्रपट मिळाला असून लवकरच अभिनय क्षेत्रात ती पर्दापण करणार आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मात्र, सोशल मीडियावर ते एकमेकांना फॉलो करत नाहीत. दोघांच्या आयुष्यात वादळ आल्याचे देखील सांगितले जातंय. युजवेंद्र चहलच्या चाहत्यांकडून मोठा आरोप केला जातोय. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न 22 डिसेंबर 2020 रोजी झाले. मात्र, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनीही सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली नाही. दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
आता धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर याचे नाव चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. श्रेयस अय्यर आणि धनक्षी वर्मा यांचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वीच श्रेयस अय्यर याच्यासोबत डान्स करताना धनश्री वर्मा ही दिसली होती. दोघांचा तो व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून धनश्री ही युजवेंद्रला धोका देत असल्याचे सांगितले जात होते.
श्रेयस अय्यरची बहीण आणि धनश्री वर्मा या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, श्रेयस अय्यर याच्यामुळेच धनश्री ही युजवेंद्रला सोडत आहे. अजून एका व्यक्तीसोबत धनश्रीचा फोटो व्हायरल होतोय.सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना यावर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी भाष्य केले नाहीये. दोघेही त्यावर भाष्य करत नाहीत. काही दिवसांपूर्वीच धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर अत्यंत खास फोटो शेअर केले.
मात्र, तिच्या एकाही फोटोमध्ये युजवेंद्र चहल हा दिसला नाही. दुसरीकडे युजवेंद्र चहल याने नवीन वर्माचे स्वागत आपल्या मित्रांसोबत केले. त्याच्या पार्टीमध्ये कुठेही धनश्री वर्मा ही दिसली नाही. यामुळेच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत.