माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली आविष्कारचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास अखंडपणे सुरु आहे. राजारामनगर येथे श्री. झंवर यांच्या हस्ते आविष्कार कल्चरल ग्रुपच्या 23 व्या संगीत महोत्सवाचा सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक शैलेश पाटील,उद्योजक योगेश पाटील (रेठरे धरण), आविष्कारचे अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले, कार्याध्यक्ष भूषण शहा, सचिव विजय लाड प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
नितीन झंवर म्हणाले, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली आविष्कारचा सुरू झालेला प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. आविष्कार ही एक संस्था राहिली नसून ती एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे. संचालक शैलेश पाटील म्हणाले, आविष्कारने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याप्रसंगी आझाद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार,अँड.धनंजय देवकर, रियाज मुल्ला, राजकुमार मदने, अलकेश दवणे,संतोष डांगे, राजेंद्र मोदुगडे यांच्यासह असंख्य कलारसिकांनी सभासदत्व स्विकारले. आविष्कार कल्चरल ग्रुपची राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सलग 22 वर्षाची दैदीप्यमान वाटचाल आपणा सर्वांना अभिमानस्पद असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ उद्योजक नितीन झंवर (आष्टा) यांनी काढले. ‘आविष्कार’ ही आपल्या तालुक्याची सांस्कृतिक ओळख असून ती जपण्यासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.