सध्या राज्यात भाजप सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी राज्यभर चालू आहे. प्रत्येक भागात जोरदार तयारी दिसतच आहे. या भाजप नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. इचलकरंजी शहरात देखील या अभियानास उत्साहात प्रारंभ झाला. या अभियानात पहिल्या च दिवशी पंधरा हजार 790 सदस्यांची नोंदणी झाली. या अभियानासाठी ठीक ठिकाणी मंडप उभारण्यात आलेले आहेत. हे अभियान 11 जानेवारी पर्यंत चालणार आहे.
इचलकरंजीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ झाला. या अभियानासाठी मंडप उभारले होते. भोवणे मळा, स्वामी मळा, गणपती मंदिर, जवाहरनगर, गणेशनगर, तारदाळ, खोतवाडी, कोरोची, चंदुर, शहापूर, महादेव मंदिर, गावभाग, गोकुळ चौक, कापड मार्केट यांसह विविध ठिकाणच्या अभियानाला सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे , माजी मंत्री आवाडे सदस्य अभियान प्रभारी विजय भोसे, अशोक स्वामी यांनी भेट दिली.
या अभियानाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी पंधरा हजार सातशे नव्वद सदस्य नोंदणी करण्यात आली. हे अभियान 11 जानेवारी पर्यंत चालणार असून या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सदस्यता नोंदणी क्रमांकावर मिस कॉल देऊन भाजपचे सदस्य होऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे