मुंबईतील गोदी कामगार मिल कामगार पोलिस व अन्य चाकरमान्यांसाठी सायंकाळी चार वाजता आटपाडी मुंबई ही एकमेव एसटी सुरू होती. मात्र, एसटीच्या जुन्या गाड्या रस्त्यामध्ये बंद पडत असल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती. सुमारे पन्नास वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत दिघंची मार्गे असलेली आटपाडी मुंबई सेंट्रल एसटी सेवा बंद करण्यात आली होती. सायंकाळी मुंबईला जाण्यासाठी एस.टी. नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.
त्यामुळे शासनाकडून महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा लाभ मिळत नव्हता. आटपाडी-मुंबई सेंट्रल बंद एसटी सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी होत होती. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन दिलेला शब्द पूर्ण केला. यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थांसह गणेश जाधव यांनीही पाठपुरावा केल्याने बस सुरू करण्यात आल्याने दिघंची परिसरातील प्रवासी तसेच महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.