इचलकरंजीच्या विसर्जन मिरवणुकीत लक्षवेधी ठरली शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची……

इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात पार पडली. जिल्हाप्रमुख रवींद्र माने दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी जवळ गणेश भक्तांसाठी चहा, नाश्ता,पाण्याची व्यवस्था करतात. यंदाही त्यांनी गणेश भक्तांसाठी मिनरल वॉटर, चहा, नाश्त्याची व्यवस्था केली.

अखेरच्या गणेशाचे विसर्जन होईपर्यंत कोणाला काही कमी पडणार नाही याची दक्षता देखील घेतलेली होती. तर पंचगंगा नदी घाटावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वखर्चातून क्रेनची व्यवस्था देखील केलेली होती. परंतु या सर्वांमध्ये सर्वात लक्षवेधी ठरली ती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची कल्पकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शहरात यशस्वी करण्यासाठी रवींद्र माने यांनी अतिशय झपाटून काम केले. त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची लवकरच शहरात अंमलबजावणी होणार आहे या योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी अनोखी शक्कल लढवत मुख्यमंत्री लाडका भाऊ संकल्पनेची शहरात जनजागृती केली.

त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे शहरात बहिणींच्या बरोबर भावांचाही सन्मान होणार यात अजिबात शंका नाही गणेश विसर्जन मिरवणुकीत फक्त लाडक्या भावाची चर्चा होती आणि हे काम फक्त तेच करू शकतात असेही लोक मिरवणूक मार्गावर बोलत होते.

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांचे स्वागत कक्ष असतात. परंतु यंदा प्रथमच महायुतीचा एकच स्वागत कक्ष होता. या स्वागत कक्षात जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची आवर्जून उपस्थिती होते. तर माजी आम. सुरेश हाळवनकर यांनी देखील उपस्थिती लावली होती.