काल सर्वत्र शाकंभरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. काल भोगी सण सुहासिनींनी अगदी आनंदाने साजरा केला. सांगोला येथील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात काल सोमवारी ६० फळ व पालेभाज्यांचां नैवेद्य दाखवून देवीची शेष महापूजा करण्यात आली. दु. १२ वा. १ हजार १०० वासिनी महिलांना मिष्ठान्न भोजन देऊन शाकंभरी पौर्णिमा ठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ७ जानेवारी मिती पौष शुद्ध अष्टमीपासून शाकंबरी देवी नवरात्र उत्सवास सुरूवात होते. यानिमित्त ७ ते १३ जानेवारी या कालावधीत श्री अंबिकादेवीस पहाटे ५ ते ६ अभिषेक, पुजा, पाठ, उपासना व आरती, दु. ३ ते ५.३० या वेळेत महिला भजनीमंडळ भजन गायन, सायं. ८ या वेळेत आरती व प्रसाद असे नितिनियमाने सुरू होते.
यामध्ये काल सोमवारी शाकंबरी पौर्णिमा निमित्त ६० फळ व पालेभाज्यांचां नैवेद्य दाखवून देवीची विशेष महापूजा करण्यात आली. दु. १२ वा. १ हजार १०० सुवासिनी महिलांना मिष्ठान्न भोजन देऊन सुवासिनींचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व उपनगरातील असंख्य महिला भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शाकंबरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळपासून मुख्य मंदिरात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिराचे पुजारी मयुरेश गुरव, सोमनाथ गुरव, ओमकार गुरव, सर्वेश गुरव आदींनी परिश्रम घेतले.