Kolkata Doctor Murder Case: आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी, कोलकात्याच्या ‘निर्भया’ला 161 दिवसांनी मिळाला न्याय

 कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलं आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृतदेह आढळून आला होता. 

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला. 

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय यांना दोषी ठरवले आहे. यावेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. संजय रॉय यांना सोमवारी (20 जानेवारी 2025) शिक्षा सुनावण्यात येणार आहे.