महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मोफत प्रवास सवलतीच्या पासची मुदतवाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना या सवलतीचा अधिक काळ लाभ घेता येणार आहे.
एसटी कामगार संघटनांच्या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोफत पाससाठी दोन्ही सत्रांत प्रत्येकी एका महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक काळ मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासाचा मोठा फायदा होईल. कामगार संघटनांनी हा निर्णय सकारात्मक मानला असून भविष्यात आणखी सवलतीसाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
मोफत प्रवास सवलत सध्या केवळ साध्या (Ordinary Bus) बससेवेसाठी लागू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अन्य प्रकारच्या बसने प्रवास करायचा असल्यास भाड्यातील फरक भरावा लागत आहे. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता येत नाही. कामगार संघटनांची प्रमुख मागणी आहे की, सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सुविधा लागू करावी तसेच पासची मुदत संपूर्ण वर्षभरासाठी वाढवावी. यावर अंतिम निर्णय घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.