यात्रेत झळकले थकबाकीदारांचे फलक, ठरले चर्चेचा विषय….

अनेक भागात सध्या यात्रांचे दिवस सुरु आहेत. यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध प्रकारचे स्टॉल्स, ज्वेलरी, खाद्यपदार्थ असे अनेक प्रकारची विक्री होत असते. सोलापूर येथील गड्डा यात्रा खूपच प्रसिद्ध आहे. या यात्रेत अनेक भागातील लोक आपली उपस्थिती दर्शवितात. सोलापूर महानगरपालिकेच्या थकबाकीदार मिळतदारांचे डिजिटल फलक गड्डायात्रेत ठिक ठिकाणी झळकले आहेत. होम मैदानाच्या सर्व प्रवेशव्दारा समोर, मार्कट पोलिस चौकी, सिद्धेश्वर प्रशालेसमोर असे फलक लावण्यात आले आहेत. एका डिजीटल फलकावर दहा नावे आहेत. मिळकत नंबर आणि थकबाकीची रक्कम फलकावर नमूद करण्यात आली आहे. शहरात 2 लाख 60 हजार मिळकतदार आहेत.

या मिळकतदारांकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात करसंकलन विभागास दिलेले उदिष्ठ पुर्तीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. मालमत्ता सिल करणे, नळ तोडणे अशी कारवाई चालू आहे. आजअखेर 140 कोटीचा टॅक्स वसुल झाला आहे. तीन महिन्यात तीनशे कोटीच्या असपास वसुलीचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे. त्यामुळे टॉप टेन थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकांच्या माध्यामतून शहराच्या विविध भागात लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

पहिल्या टप्यात शुक्रवारी 17 जानेवारी रोजी ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेत होम मैदानावर तब्बल 25 ते 30 डिजीटल फलक झळकले आहेत. सिध्देश्वर प्रशाला येथे दोन, मार्केट पोलिस चौकी समोर दोन आणि होम मैदानाच्या प्रत्येक गेटवर प्रत्येकी तीन असे डिजीटल लावण्यात आले आहेत. गड्डा यात्रा फिरण्यासाठी आपल्या परिवारसह येणार्‍या शहरवासीयांना हे फलक चर्चाचे विषय ठरले आहे. आपल्या शेजारी, नातेवाईक यांचे नावे असल्यास त्यांना फोन करून यांची माहिती दिली जात आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाच्या या टॅक्स वसुलीचा नवा फंडा गड्डा यात्रा फिरण्यासाठी आलेल्या शहरवासीयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.