मागील 3 ते 4 वर्षापासून संत गतीने सुरू असलेले ट्रामा केअर सेंटर प्रत्यक्षात सुरू कधी होणार ? नागरिकांमधून चर्चा 

अपघातानंतर रुग्णांवर तात्काळ आपल्या सांगोल्यातच उपचार व्हावेत, या दृष्टीने 10 कोटी रु. मंजूर निधीतून उभारले जात असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे मागील 3- 4 वर्षापासून संत गतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळून सदरची ट्रामा केअर सेंटर प्रत्यक्षात सुरू कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील अनेक वर्ष या इमारतीचे कामकाज सुरू असताना येथे लवकरच आरोग्याच्या सोयीसुविधा सुरू होणार असलेल्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु अद्याप ही कामच सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने ट्रामा केअर सेंटर ही शोभेची वस्तू बनली आहे. सांगोला- पंढरपूर, सांगोला -सोलापूर, सांगोला -मिरज- कोल्हापूर -रत्नागिरी अशा राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज पूर्ण झाल्याने तसेच शहरासह परिसरातील सर्वच मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

सध्या अपघातग्रस्तांना अन्यत्र हलवण्यात मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असल्यामुळे अनेकदा रुग्णांस प्राणास मुकावे लागत आहे. अवजड व अन्य वाहनांची रहदारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. वाढणाऱ्या वाहतुकीमुळे होणारे संभाव्य अपघात लक्षात घेता प्रशासनाने या अपघातग्रस्तांना तातडीने तरी वैद्यकीय मदत मिळावी व उपचारग्रस्तांचे प्राण वाचावे, यासाठी सांगोला येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सुरू केले आहे. या ट्रामा केअर सेंटर मध्ये सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.

यामध्ये सध्या अपघात झाला तर आपतकालिन स्थितीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसते. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मात्र, तज्ज्ञ उपलब्ध असनार आहेत. यामुळे कोणत्याही जखमींना तातडीने उपचार मिळेले. यामध्ये सर्जन, डॉक्टर, ऑपरेशन थिएटर, सर्जिकल आयसीयू, प्राथमिक उपचार कक्ष, अत्याधुनिक यंत्रणा व वेगळ्या इमारतीचा व कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

  अपघातानंतर रुग्णांवर तात्काळ सांगोल्यातच उपचार व्हावेत, या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने, ट्रॉमा केअर सेंटर ही मागील तीन ते चार वर्षापासून शोभेची वस्तू म्हणून राहिली आहे. ही प्रत्यक्षात कधी सुरू होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.