आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते कसबे डिग्रज आणि मौजे  डिग्रज या गावांना जोडणारा नवीन पूलाला विठोजीराव चव्हाणांचे नामकरण

सध्या अनेक गावागावात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, वाहतूक, पाणी तसेच अनेक विविध समस्यांवर उपाययोजना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज आणि मौजे  डिग्रज या गावांना जोडणारा नवीन पूल हा या परिसरातील महत्त्वपूर्ण विकासकामांपैकी एक आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून सुमारे १२ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करून हे काम पूर्ण करण्यात आले. या पुलाच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा फायदा झाला आहे, कारण पूर्वी पावसाळ्यात कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढल्यामुळे जुना बंधारा पाण्याखाली जात होता.

ज्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटत होता. आता या नवीन पुलामुळे वर्षभर सुरक्षित आणि अखंडित वाहतूक सुनिश्चित झाली आहे.कसबे डिग्रज ते मौजे डिग्रज गावाला जोडणाऱ्या नव्या पुलाला श्रीमंत हिम्मतबहाद्दर सेनानी विठोजीराव चव्हाण पूल असे नामकरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अॅड. संग्रामबाबा शिवाजीराव चव्हाण यांच्याहस्ते या पुलाचे नामकरण करण्यात आले.

यावेळी संजय चव्हाण, आनंदराव नलवडे, सरपंच रियाज तांबोळी, माजी सरपंच अशोक चव्हाण, माजी उपसरपंच सागर चव्हाण, अरूण पवार, प्रा. सिकंदर जमादार, विशाल चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.