उद्यापासून इचलकरंजीत रोटरीच्यावतीने अन्न उत्सवाचे आयोजन

वस्त्रनगरी म्हणून जगजाहीर असणाऱ्या इचलकरंजी शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याला शहरवासियांचा उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. रोटरीच्या वतीने देखील अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. उद्यापासून इचलकरंजीत रोटरीतर्फे अन्न उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. गेली ३२ वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या येथील रोटरी क्लब सेंट्रलच्यावतीने रोटरी सेंट्रल अन्न उत्सव हा उपक्रम राबवला जातो.

यावर्षी २१ ते २७ जानेवारी या कालावधीत स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर हा अन्न उत्सव होणार आहे. यामध्ये इचलकरंजी, दावणगिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, बेळगाव शहरातील तसेच इतर राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे शाकाहारी मांसाहारी असे स्वतंत्र एकुण ८० स्टॉल त्याचबरोबर विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन असणार आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख शिवकुमार धड्ड यांनी दिली.

उद्या दि. २१ जानेवारीला सायंकाळी खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि रोटरीचे प्रांतपाल शरद पै (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. तर २७ जानेवारीला सायंकाळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

२२ जानेवारीला तिळापासून गोड पदार्थ आणि नाचणीपासून तिखट पदार्थ, २३ जानेवारीला संक्रांत थाळी आणि २४ जानेवारीला चिकनपासून कटलेट आणि पांढरा रस्सा बनवणे या पाककला स्पर्धा होणार आहेत. या अन्न उत्सवाचा नागरीकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहनही धड्ड यांच्यासह संयोजकांनी केले यावेळी सतीश पाटील, शीतल भरते, नागनाथ बसुदे, नितीशकुमार कस्तुरे, हिराचंद बरगाले, घनश्याम सावलानी,