अलीकडे खून, मारामारी, आत्महत्या, अपघात यांसारख्या घटनांमध्ये भयंकर वाढ झाल्याचे निदर्शनास येतच आहे. अनेक महिला या आत्महत्येस प्रवृत्त होतात. कौटुंबिक छळास कंटाळून देखील बरेचजण आत्महत्या करतात. चारित्र्याच्या संशयावरून आणि दुसरीही मुलगीच झाली या कारणावरून होणाऱ्या सासऱ्या जाचाला कंटाळून स्वाती अमोल ऐवळे (वय २३, रा. कोरोची) या विवाहीतेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यापैकी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वातीच्या सासरचे लोक चारित्र्याच्या संशयावरून आणि दुसरीही मुलगीच झाली या कारणावरून छळ करत होते. या छळाला कंटाळून स्वातीने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरेश बिरलिंगे यांच्या फिर्यादीनुसार अमोल ऐवळे (पती), हनमंत ऐवळे (सासरे), सुरेखा ऐवळे (सासू) आणि दिर राजू ऐवळे (सर्व रा. कोरोची) या चौघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी सासु सुरेखा यांना वगळता उर्वरीत तिघांना अटक केली आहे. त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.