आ.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून रस्ते कामाचा शुभारंभ! नागरीकांतून सामाधान, सर्वत्र कामाचं कौतुक

इचलकरंजी मतदारसंघातून आमदारपदी डॉ. राहुल आवाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर विकासकामांचा धडाका सुरु लावलेला आहे. शहरवासीयांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्वामी अपार्टमेंट ते ठाकरे चौक, मराठा चौक ते जुना एसटी स्टँड या परिसरातील या रस्त्याच्या काम करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून स्वामी अपार्टमेंट ते ठाकरे चौक, मराठा चौक ते जुना एसटी स्टँड या परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

आ.डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यामुळे जवाहरनगर परिसरातील नागरीकांतून सामाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माजी सभापती राजू बोंद्रे, बंडू मुळीक, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, दत्ता मांजरे, माजी नगरसेवक उत्तम विभुते, सुनील पवार, भास्कर बांधिगिरे, सुनील कोरवी, सुबोध कोळी, बाळासाहेब माने, बबन केटकाळे, विजय कोराणे, सतीश घोरपडे, राजू देसाई, नितीन विभुते, राजाराम पोवार यांच्यासह भागातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. राहुल आवाडे यांनी निवडून आल्यानंतर कामाचा प्रचंड धडाका लावलेला आहे. प्रसंगी स्वखर्चातून विकास कामं केली जात आहेत. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.