विट्यात २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, आम. सुहास भैय्यांनी हालवली आरोग्य यंत्रणा डॉक्टर हायअलर्टवर ….

विट्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चक्क २३ विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळेच्या आहारातून हि विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विट्यातील साळशिंगे रस्त्यावर आयटीआय कॉलेज शेजारी असणाऱ्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहारातून ही विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर अक्षरशः हादरून गेला आहे.

या निवासी शाळेत एकूण ९३ विद्यार्थी असून त्यापैकी तब्बल 23 विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शासकीय निवासी शाळेचे रुटीन सुरू असताना रविवारी 19 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मांसाहारी जेवण देण्यात आले. त्यानुसार दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना मटन तर सायंकाळी पाच वाजता दूध आणि कलिंगडाचा आहार देण्यात आला.

तर रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण देण्यात आले. त्यानंतर रात्रीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटी सारखा त्रास सुरू झाला. यानंतर सकाळ होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जूलॅब, उलटी आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. यानंतर विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिक झाल्याचे लक्षात येतात शाळा प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयात तब्बल 23 विद्यार्थ्यांना जुलाब, पोटदुखी आणि उलटी सारखी लक्षणे आढळून आली या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच आमदार सुहास भैया बाबर यांनी कातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी केली. यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांनी शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम या विद्यार्थ्यांना उपचार करण्यासाठी ताकदीने सजज झाली आहे. विट्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असून 23 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. तर उरलेल्या दोन अशक्त मुलांवर डॉक्टरांकडून विशेष लक्ष ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही संपूर्ण घटना हलक्यात न घेता सुहास भैया बाबर यांनी विट्यातील ओम श्री हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर अलोक नरडे यांनादेखील ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांचे उपचारासाठी बोलावून विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सतर्कता दाखवली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात सध्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली असून आमदार सुहास बाबर यांच्या सूचनेनुसार निवासी शाळेत देखील डॉक्टरांचे एक पथक पाठवून संपूर्ण विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयासह शासकीय निवासी शाळेसमोर ॲम्बुलन्स देखील पाठविण्यात आली आहे.

आमदार सुहास भैया बाबर आणि डॉक्टरांच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर हा संपूर्ण प्रकार नेमका कशामुळे घडला याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली असून विटा पोलिसांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.