लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक भागात आमदार खासदार नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक विकासकामांसाठी निधी देखील ते मंजूर करून आणत आहेत. शिरोळ-अर्जुनवाड मार्गावरील टारे मंगल कार्यालय येथे जि.प. अनु. जातीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जातीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवताना – सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे असे मत खास. धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
पुढच्या काळात समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत, असे मत आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. तर समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ताकदीने मी आपल्या सोबत राहीन, असे अभिवचन आम. डॉ. अशोकराव माने यांनी दिले. सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. चंद्रकांत मोरे, प्रताप उर्फ बाबा पाटील, मनोहर कोळी, विजय आरगे, सौ. भारती कोळी, आप्पासाहेब कोळी, राजेंद्र कोळी, सौ. मोहिनी कोळी, संभाजी भोसले, दिलीप शिरढोणे, विकास शिरगावे, पोपट पुजारी, भगवान कोळी, रमेश कोळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.