आदित्य ठाकरे, जयंत पाटील एकाच तारखेला हातकणंगलेत….

सगळीकडेच निवडणुकीची तयारी सुरू आहे. सर्व पक्ष आपापले मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे नवीन वर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात हुपरी येथे जाहीर सभेसाठी येणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे शिरोळ मध्ये याच तारखेला येणार आहेत. हुपरीत उद्धव ठाकरे यांची नो किंवा दहा तारखेला जाहीर सभा होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन यासाठी शिरोळ शहरात येणार आहेत.

तसेच शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दौरा आयोजित केल्याचे समजत आहे. तर वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा दौरा आयोजित करण्याचे काम सुरू असल्याचं समजतं. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीने टाईट करायला आरंभ केला आहे.

उमेदवारी ही कोणाची स्पष्ट नसली तरी शिराळा विधानसभा मतदारसंघ व इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एकतर्फी ताकद शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला चुरशीची झुंज लोकसभेसाठी जनसुराज्य बरोबर द्यावी लागणार आहे.दरम्यान इंडिया आघाडीच्या शरद पवार गटाकडून मदन कारंडे यांचेही नाव घेतले जात आहे.