वधू वर मेळाव्याबरोबरच सामुदायिक विवाह समारंभाचे नियोजन करावे; माजी आम. प्रकाश आवाडे

इचलकरंजी शहरात अनेक विविध सामाजिक उपक्रम तसेच अनेक विविध रंगी कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यास शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. इचलकरंजी शहरातील घोरपडे नाट्यगृह येथे २९वा राज्यव्यापी जैन वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला.

गेल्या २९ वर्षापासून जैन समाजाच्या विविध क्षेत्रातील, उच्च शिक्षित, शेतकरी , व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वधू वरांच्या परीचय मेळाव्याचे सुनियंत्रित नियोजन जैन उत्कर्ष मंडळ करीत आहे, ही समाजाला अभिमानाची गोष्ट आहे, वधू वर पालक परिचय मेळाव्याबरोबरच सामुदायिक विवाह समारंभाचे नियोजन करा असे प्रतिपादन माजी आम. प्रकाश आवाडे यांनी केले. ते घोरपड़े नाट्यगृह येथे जैन उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी आयोजित २९वा राज्यव्यापी जैनवधु-वर पालक परिचय मेळाव्या प्रसंगी बोलत होते. प्रारंभी माजी खास. कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करणेत आले. प्रकाशराव आवाडे यांचे हस्ते, भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. याचवेळी वधुवरांचे रंगीत फोटोसह परिचय देणाऱ्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन विविध मान्यवरांचे हस्ते करणेत आले.