महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व जुन्या वाहनांना (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे आवश्यक करण्यात आले आहे.
HSRP बसविण्याची अंतिम तारीख: 31 मार्च 2025
नियम न पाळल्यास होऊ शकतो ₹10,000 चा दंड
फिटमेंट सेंटरच्या सुविधेसाठी: राज्यभर विविध तालुका व जिल्हा पातळीवर अधिकृत HSRP सेंटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
HSRP नंबर प्लेटचे शुल्क
दुचाकी व ट्रॅक्टर्ससाठी: ₹531
तिपहिया वाहनांसाठी: ₹590
लाइट मोटार वाहनं, पॅसेंजर कार, मध्यम व जड व्यावसायिक वाहनांसाठी: ₹879
शुल्क नुसार मिळणाऱ्या सुविधा : युनिक होलोग्राम स्टिकर, लेसर ब्रँडेड आयडी, छेडछाड न होणारे स्नॅप लॉक
HSRP नंबर प्लेटचे मुख्य फायदे
चोरी रोखण्यास मदत: चोरी झालेल्या वाहनांची ओळख पटवणे सोपे.
सुरक्षितता: छेडछाड-प्रतिरोधक तंत्रज्ञानामुळे वाहन संरक्षित राहते.
राष्ट्रीय सुरक्षा मजबूत: डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होणे कठीण.
वाहन ओळख पद्धती सुधारली जाते: डिजिटल रेकॉर्डमुळे गाडीचा मागोवा घेता येतो.
ऑनलाइन अर्ज कसा कराल
महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या https://transport.maharashtra.gov.in
वाहनाचा तपशील द्या, वाहन नोंदणी क्रमांक, वाहन मालकाचे नाव, वाहन प्रकार, शुल्क भरा: ऑनलाइन पेमेंटद्वारे फीस भरा.
अपॉइंटमेंट बुक करा: तुमच्या जवळच्या अधिकृत HSRP फिटमेंट सेंटरची निवड करा.
ऑफलाइन प्रक्रिया
जवळच्या फिटमेंट सेंटरवर थेट जाऊन अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे सोबत घ्या (वाहनाची आरसी, आधार वगैरे).
तिथेच शुल्क भरून नंबर प्लेट बसवा.
जर तुम्ही नियमानुसार HSRP बसवले नाही, तर: ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाईल. वाहन चोरीच्या वेळी ओळख करणे कठीण होईल.
