सद्या प्रत्येक भागात स्वच्छतेच्या बाबतीत खूपच काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसत आहे. आपला परिसर कसा स्वच्छ राहील याकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले आहे. इचलकरंजी शहरात असाच एक उपक्रम स्वच्छतेच्या बाबतीत राबविण्यात येत आहे.
इचलकरंजी महापालिकेच्यावतीने आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार या अभियानात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती राजाराम स्टेडीयम येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. २५० कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते..