लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोल्हापूर दौर्यावर येत आहेत; तर खासदार सुप्रिया सुळे यांचाही उद्या शुक्रवारी कोल्हापूर दौरा आहे. खासदार शरद पवार यांचे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.शिवाजी विद्यापीठामध्ये दुपारी पाच वाजता व्हाईट आर्मीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सात वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी सकाळी सांगलीकडे रवाना होतील.
उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता खासदार सुप्रिया सुळे यांचे कोल्हापुरात आगमन होईल. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू पॅलेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता रेल्वेस्टेशनसमोरील रॉयल मिरज आर्केड बिल्डिंगमधील हॉलमध्ये होणार्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास त्या मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले आहे.